आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
उस्मानाबाद : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपला धक्का दिला आहे.
उस्मानाबाद येथील काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक जवळगे, उस्मानाबाद पंचायत समितीचे माजी उपसभापती शाम जाधव, माजी नगरसेवक प्रदीप घोणे, गणेश खोचरे, पंकज पडवळ, क्लीन समता ग्रीन समताचे अध्यक्ष तसेच भाजप नेते नाना घाडगे, महेश काटे यांनी त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसहित शिवबंधन हाती बांधलं.
हे ही वाचा : …तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही मला संपवू शकत नाही; पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण
दरम्यान, या पक्षप्रवेशावेळी, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजे निंबाळकर व इतर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का ; ‘या’ बड्या नेत्याच्या मुलाने केला शिवसेनेत प्रवेश
शिवभोजन थाळी चालू राहणार की बंद?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू, थापा शिंदे गटात का गेले?; शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…