मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा निर्णय जाहीर केला. आरे मेट्रो कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
मी दिलेला शब्द पाळणारा आहे. त्यामुळे आरे कार शेडच्या कामाला स्थगिती दिलीय. त्याचा आढावा घेतल्याशीवाय पुढे जाणार नाही. मी विकासाच्या विरोधात नाही. मात्र अंधाधूंद कारभार चालणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणले.
मेट्रो प्रकल्पाच्या कामाला विरोध नासल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पण रातोरात झाडांची कत्तल झाली हे चालणार नाही. आरेमधील एकही पान तोडू दिलं जाणार नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
दरम्यान, या धाडसी निर्णयानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखी कोणते धाडसी निर्णय घेतात. याबाबत संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आता उत्सुकता आहे.