“उद्धव ठाकरे साहेब तुमची गाठ माझ्याशी आहे, इथले सगळे हिशेब द्यावेच लागतील”

0
160

मुंबई : अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने गुरुवारी पत्रकारपरिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला होता. किरीट सोमय्या हे ठाकरे कुटुंब आणि अन्वय नाईक यांच्यात झालेल्या जमीन व्यवहारात इतका रस का घेत आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. यावर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाईक कुटुंबीयांना पुढे करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे पैशांची अफरातफर करत आहेत. परंतु, उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे. तुम्हांला सगळे हिशेब द्यावेच लागतील, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, मी नाईक कुटुंबीय आणि ठाकरे यांचा जमीन घोटाळा बाहेर काढला तेंव्हा शिवसेनेचे 12 नेते माझ्याविरोधात एकवटले होते. मात्र, आता हे सगळे कुठे गेले, असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी –

“चंद्रकांत दादा तुम्ही अविश्वास ठराव तर आणा, मग आघाडी किती भक्कम आहे हे तुम्हांला कळेल”

अभिनेता मनोज बाजपेयीला कोरोनाची लागण; घरीच स्वत:ला केलं क्वारंटाईन

राज्यातील जनतेसाठी महाविकासआघाडी हा एक त्रास- नितेश राणे

‘बडे मिया-छोटे मिया’ छोटे मिया सुभानल्लाह गाण्यावर धवन-सूर्यकुमारची जबरा ऍक्टिंग; पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here