उद्धव ठाकरे नवीन पायंडा पाडतील; पंकजा मुंडेंकडून मुख्यमंत्र्यांच्या कामचं कौतुक

0
157

मुंबई : राज्यात करोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्य सरकारनं तातडीनं पावलं टाकतं महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कामाला लोकांकडून दाद मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपाकडून ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका केली जात आहेत. मात्र, भाजपाच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सरकारच्या सध्याच्या कामाविषयी भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरे नवीन पायंडा पाडतील, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, भाजपाची सरकारविषयी अशी भूमिका असताना भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना कौतुक केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…म्हणून लोकसभा निवडणुकीत भाजपनं किरीट सोमय्यांच तिकीट कापलं- नवाब मलिक

उद्धवा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे, सगळी जबाबदारी तू उत्तमरित्या पेलतो- सिंधुाताई सपकाळ

औरंगाबादेत शिवीगाळ करत युवकांनी केली पोलीसांना मारहाण; पाहा व्हिडीओ

शिवभोजन एकदाच मिळतं, दुसऱ्यांदा लोकांनी उपाशी राहावं का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here