“उद्धव ठाकरे राज्यातच नाही तर राष्ट्रीय राजकारणातही प्रगती करतील”

0
294

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : सततच्या वाढत असलेल्या महागाईविरोधात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादमध्ये मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौकातून निघालेल्या या मोर्चाचे  गुलमंडी येथे समापन झाले. यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं.

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून हटवण्यासाठी भाजप अनेक प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. उलट उद्धव ठाकरे राज्यातच नाही तर राष्ट्रीय राजकारणातही प्रगती करतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

हे ही वाचा : अखेर अमोल कोल्हेंनी सांगितलं एकांतवासाचं गुपित; म्हणाले…

आम्हाला व्यवस्थितपणे राज्य चालवू न देण्याचे कारस्थान विरोधी पक्ष रचत आहे. केंद्र सरकार त्यांना पाठिशी घालत आहे. पण एक लक्षात ठेवा, आम्हाला हात लावाल तर तुमचे हात जळतील. भगवा हातात घेऊन शिवसेना पुढे जात आहे, हे त्यांना देखवत नाही. शिवसेनेचा झेंडा कधीही खाली आला नाही आणि येणारही नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे. आम्ही तुमच्या छाताडावर पाय ठेवून पुढे जाऊन दाखवू. उद्धव ठाकरे राज्यातच नाही तर राष्ट्रीय राजकारणातही प्रगती करतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महागाईविरोधातील लक्ष वळवण्यासाठी भाजप विविध निरर्थक मुद्द्यांना पुढे करतं. देशातील 13 राज्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये पराभव झाल्यापासून भाजपाच्या मनातील अस्वस्थता ही स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे भाजपाने पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम, जातीय दंगे, जातीय द्वेष ही त्यांची हत्यारं त्यांनी बाहेर काढायला सुरुवात केली आहे. राज्यातील दंगलखोर हे वेगळेच कुणीतरी आहेत. त्यांना दंगलीसाठी प्रायोजकत्व देण्यात आलं आहे. असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यातील 95 टक्के मुसलमान प्रामाणिक, 5 टक्के मुस्लिम गडबड करतात- चंद्रकांत पाटील

एसटी कर्मचाऱ्यांना कोणीतरी भडकवतंय; अजित पवारांचा गंभीर आरोप

पायातली ‘कोल्हापूरी चप्पल’ हातातही घ्यायला शिका; राजू शेट्टींचा शेतकऱ्यांना सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here