Home महाराष्ट्र पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील- नाना पटोले

पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील- नाना पटोले

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडी, येत्या काळातील निवडणुका आणि मुख्यमंत्रिपदाबाबत आज भाष्य केलं.

पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, असं नाना पटोलेंनी यावेळी स्पष्ट सांगितलं. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. 5 वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असं नाना पटोले म्हणाले.

शरद पवार यांनी आपलं मत सांगितलं, तसं मी माझ्या पक्षाचं मत सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा काँग्रेस स्वबळावर लढावे, ही जनभावना आहे. मी मन की बात सांगत नाही, असंही नाना पटोलेंनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून गौरविलेले अकोल्याचे मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. नाना पटोले यांनी यावेळी बोलताना, मुख्यमंत्रीपदाची इच्छा जाहीर केली. नाना पटोले चांगला व्यक्ती असल्याचं त्यांनी स्वत:च सांगितलंय.

महत्वाच्या घडामोडी –

…तर काँग्रेसने महाविकासआघाडी सरकारचा पाठिंबा काढावा- रामदास आठवले

नारायण राणे दिल्ली दौऱ्यावर; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चिन्हं

“दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, उदयनराजे आणि माझं सर्वच मुद्द्यांवर एकमत”

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपाला बिहार निवडणूक लढवायची होती- नवाब मलिक