पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन अभिवादन केलं. यावेळी बोलताना इतके वर्ष उगाच दूर होतो. आता आम्ही एकत्र आल्यानंतर एवढी वर्ष उगाच घालवली असं वाटतंय. मात्र आता आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो आहोत, सर्व चांगलं होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शिवरायांच्या चरणी आज मी एकच मागितलं आहे. प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक पाऊली आम्हाला तुमचं मार्गदर्शन राहू द्या. जनतेला अपेक्षित सरकार आल्यामुळे आज ही गर्दी दिसत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आज आम्ही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवभक्त म्हणून याठिकाणी आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. ज्यावेळी देशावर हिरवं संकट आलं होतं त्यावेळी त्याच्या चिंधड्या करण्याचं काम छत्रपतींनी केलं, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, आमचा विचार भगवा आहे, आमच्या धमन्यात भगवा आहे, असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
शरद पवारांनी दिला पक्षातील मंत्र्यांना ‘हा’ मोलाचा सल्ला
इथल्या कट्टर शिवसैनिकांना विचारा, नाव बदलायचं की विकास करायचा; इम्तियाज जलील
“मासिक पाळी नाही हे सिद्ध करण्यासाठी विद्यार्थींनीची तपासणी करणं दुदैवी”
मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी 68 विद्यार्थिनींना काढायला लावले अंतर्वस्त्त्रे