उद्धव ठाकरे हे भाजपसोबत युती करण्यास तयार होते, पण…; रामदास कदमांचा मोठा गाैफ्यस्फोट

0
427

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची धाड पडली असून गोरेगावाच्या पत्राचाळ प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली असून काल रात्री ईडीनं संजय राऊत यांना अटक केली. यानंतर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला.

शिवसेनेतून जे फुटले ते भाजपचे गुलाम झाले असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. यावरून आता रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : संजय राऊत यांच्यानंतर आता शिवसेनेचा ‘हा’ मोठा नेता तुरूंगात जाणार; आमदार रवी राणा यांचा आरोप

गुलाम कोण कोणाचं होतं हे बघा. तुम्ही राष्ट्रवादीचे गुलाम आहात का याचा विचार केला पाहिजे. नारायण राणे आणि नवनीत राणा यांना देखील अटक झाली होती, मात्र संजय राऊत ज्या पद्धतीने हात दाखवून गेले तेव्हा वाटलं मोठी लढाई लढायला चालले आहेत, असं रामदास कदम म्हणाले. तसेच यावेळी बोलताना रामदास कदमांनी एक गाैफ्यस्फोटही केला.

उद्धव ठाकरे हे भाजपसोबत युती करण्यास तयार झाले होते, मात्र तिथे संजय राऊत आले आणि सर्व फिस्कटलं , असा गाैफ्यस्फोट रामदास कदमांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“अखेर संजय राऊत यांना ईडीकडून अटक, महिलेला धमकावल्याप्रकरणी पोलिसात FIR दाखल”

काँग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्याने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकिय चर्चांना उधाण

“शिवसेनेत इनकमिंग सूरूच; घोडबंदर परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here