मुंबई : शिवसेनेने उत्तर प्रदेशमधील सर्व 403 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढवणार असून पक्षाने कोणत्याही इतर पक्षासोबत युती केलेली नाही. मात्र भविष्यात युती होण्याचे संकेत पक्षाने दिलेत. यासंदर्भातील एक पत्रक शिवसेनेचे उत्तर प्रदेशचे प्रभारी विश्वजीत सिंह यांनी प्रकाशित केले होते. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या सर्व घोषणा राज्यातील घडामोडींवरुन लक्ष्य विचलीत करण्यासाठी केल्या जात आहेत. यापूर्वी बिहारमध्ये निवडणूक लढवताना शिवसेनेच्या उमेदवारांचं डिपॉझीट जप्त होण्याबरोबरच काही उमेदवारांना 100 मतंही पडली नव्हती! उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा, असा टोमणा किरीट सोमय्या यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं; बाळासाहेब थोरातांचं आवाहन
कर्जतमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
कोणत्याही निर्णयावर ठाम नसणं हा राष्ट्रवादीचा इतिहास; मनसेचा टोला