“शिवसेनेचाच खासदार होणार आणि विजयी सभेला उद्धव ठाकरे येणार”

0
794

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप आणि शिवसेनेने कंबर कसली असून दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. आज शिवसेनेकडून प्रचार सभा घेण्यात आली. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “जी व्यक्ती सुरक्षित मतदारसंघाचा आधार घेते, त्यांना गंभीरतेने घेण्याची गरज नाही”

दादरा नगर-हवेलीत एक ज्येष्ठ खासदार आपले जीवन संपवतो. ही धक्कादायक घटना असून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबत कोणतेच पाऊल उचलण्यात आलेले नाही. आता महाराष्ट्र सरकार या प्रकरणाची चौकशी करणार आहे. भाजपचे अनेक लोक या प्रकरणाशी संबंधित आहेत; कारण डेलकर यांच्या चिठ्ठीत अनेकांची नावे आहेत. इतकेच नाही तर स्थानिक प्रशासकाचेही त्यात नाव आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे, ही जागा जिंकतोय आणि विजयी सभेला उद्धव ठाकरे येतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,दादरा नगर-हवेलीतील मराठी मतदान भाजपच्या पारड्यात पडेल, असे फडणवीस यांना वाटत आहे, मात्र तो त्यांचा गैरसमज आहे. इथली मराठी जनता पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी आहे, असा दावाही यावेळी संजय राऊतांनी केला.

महत्वाच्या घडामोडी – 

“भाजपला मोठा धक्का, ‘या’ आमदाराने केला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश”

भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वाधिक ड्रग्ज विकले जातात- रामदास आठवले

“यंदाच्या दिवाळीला अमृता फडणवीस चाहत्यांना देणार एक सुरेल दिवाळी गिप्ट”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here