मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत ‘कोणाच्याही बायका-मुलांवर आरोप करणं हा अक्करमाशीपणा आहे’, अस म्हटलं होतं. यावरून आता किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसून येते, आता त्यांच्याकडून हिंदू रक्षणाची अपेक्षा”
‘मी ठाकरेंच्या विधानाशी एकदम सहमत आहे. कोणीही खोटे आरोप केलेले योग्य नाही. पण जर उद्धव ठाकरे आपल्या बायकोच्या रश्मी उद्धव ठाकरेंच्या नावाने घोटाळा करत असेल तर साडेबारा कोटी जनता जाब विचारणार. मुख्यमंत्री लुटमार करतात. उपमुख्यमंत्री तर अरे बापरे! अजित पवारांनी विधान केलं होतं, माझ्या बहिणीच्या घरी का इनकम टॅक्सवाले गेले? किरीट सोमय्यांनी सगळी कागदपत्रं ठेवली ना? तर बायकोच्या नावाने, बहिणीच्या नावाने बेनामी व्यवहार करणं हे त्याहीपेक्षा मोठ पाप आहे. मग तो मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो. , असं सोमय्या म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा मुलगा त्या बिल्डरसोबत संचालक होता, किरीट सोमय्याने कागदपत्रं ठेवली ना? मग का पार्टनरशीप मागे घेतली? म्हणून महापालिकेच्या माफिया कॉन्ट्रॅक्टरकडून पार्टनरशीपचा मिळालेला पैसा बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणार असाल तर त्याचा जाब मुख्यमंत्र्यांना द्यावा लागणार, असंही सोमय्या यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
फडणवीस सरकारच्या काळातील सर्व घोटाळे बाहेर काढणार- नवाब मलिक
“शरद पवार आमच्यापेक्षा मोठे, त्यात काही वादच नाही”