उद्धव ठाकरे म्हणाले सरकार पाडून दाखवा; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

0
286

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार भाजपने पाडून दाखवावंच, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात बोलताना केलं होतं. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : शिवसेना वाघाचा मुखवटा लावलेली मेंढी आहे; रावसाहेब दानवेंची बोचरी टीका

उद्धव ठाकरे यांनी सारखा ‘ सरकार पाडून दाखवा, पाडून दाखवा’ चा धोशा का लावला आहे. मीच तुम्हाला आव्हान देतो की, तुम्ही एकदा सरकार चालून तर दाखवा, कामं करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना मदत करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना दिलासा देऊन तर दाखवा, असे फडणवीस यांनी म्हटले. उद्धव ठाकरे भाजपला उपऱ्यांचा पक्ष म्हणून हिणवतात. पण त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे., असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे विचारांचं सोनं नव्हतं. तर ते मुख्यमंत्र्यांच नैराश्य (फ्रर्स्टट्रेशन) होतं. असंगाशी संग केलात की असंच होणार, अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

महाविकास आघाडीचे सरकार पडेल की नाही यातून बाहेर पडा, अन्…; पंकजांचा भाजपला घरचा अहेर

मनसेचं महाविकास आघाडी सरकार निषेधात आंदोलन; केलं रावणरुपी आघाडी सरकरच्या पुतळ्याचं दहन

चौथ्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरत चेन्नईने लुटलं विजयाचं सोनं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here