आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी शिवसेनेची 25 वर्षे युतीत सडली असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्याला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय आहे.
25 वर्षे त्यांना वाटलं नाही की सडलो आणि दोन वर्षात त्यांना वारंवार साक्षात्कार होतोय. त्याचं कारण सत्ता असूनही जी घुसमट, जे वैफल्य बाहेर पडताना दिसत आहे. 25 वर्षे भाजपसोबत सडली तर मग दोन वर्षात शिवसेना वाढली का?, असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला आहे.
हे ही वाचा : ‘…तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी झालीच नसती’; सुधीर मुनगंटीवारांची टीका
दरम्यान, मुख्यमंत्री त्यांचा असूनही निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली, याचं आत्मपरीक्षण करा. मग अस्वस्थता का आहे? सरकार असूनही आपली वाढ का होत नाही? भाजपवर तर परिणाम नाही. राज्यातील सगळ्या निवडणुकीत भाजप पहिल्या नंबरवर आहे. तुमच्याशिवाय आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत आणि तुम्ही चौथ्या नंबरवर आहात हे लक्षात घ्या, अशी टीकाही प्रविण दरेकर यांनी केली.
महत्वाच्या घडामोडी –
भाजप हिंदुत्वाचा वापर सोयीसाठी करत आहेत- उद्धव ठाकरे
रोहित पाटील यांना राष्ट्रवादीत मोठं पद?; जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…