आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.
विधिमंडळाच्या अधिवेशनात शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव 164 विरूद्ध 99 अशा फरकाने जिंकला. ठराव जिंकल्यानंतर शिंदेंनी सभागृहातील भाषण चांगलंच गाजलं. या भाषणावरून उद्धव ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावला होता. रिक्षावाल्याची रिक्षा काल चांगलीच सुसाट सुटली होती. , असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला होता. यावरून आता एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हे ही वाचा : वादग्रस्त पोस्ट प्रकरणी आपली बाजू मांडताना केतकी म्हणाली, पवार म्हणजे…
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!, असं ट्विट करत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!#MaharashtraFirst
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
…या चार लोकांच्या कंडोळ्यांनी आमच्या उद्धवसाहेबांना बावळट केलं- गुलाबराव पाटील
शिवसेनेचे आमदार फुटत होते आणि मला दुःख होत होतं- बाळा नांदगावकर