मुंबई : लब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे राज्यात मंगळवारपासून 5 जानेवारीपर्यंत मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यावर करोना काय फक्त रात्री फिरतो का?, असा सवाल मनसे सरचिटनीस संदिप देशपांडे यांनी केला होता. याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.
दोन दिवसांपासून संचारबंदी सुरु असून अनेकजण करोना रात्री मोकाट फिरतो आणि दिवसा घऱात बसतो का? अशी विचारणा करत आहेत. तसं नाहीये….जनतेला थोडीशी जाणीव करुन द्यायची गरज असते. अजूनही आपल्याला बंधनांची आवश्यकता आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, दिवसा आपण लॉकडाउन करु शकत नाही. तशी वेळही येऊ नये. निदान रात्रीची संचारबंदी आहे म्हटल्यावर त्यांना धोक्याची जाणीव होते. अनावश्यक गर्दी टाळणं हे जास्त महत्वाचं आहे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही”
“फ्लिपकार्टने मराठी केलं, आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार”
जाणते नव्हे तुम्ही तर विश्वासघातकी राजे; सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर बोचरी टीका