Home महत्वाच्या बातम्या “हा शिवरायांचा लढणारा महाराष्ट्र आहे, या संकटावर मात केल्या शिवाय राहणार...

“हा शिवरायांचा लढणारा महाराष्ट्र आहे, या संकटावर मात केल्या शिवाय राहणार नाही”

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. शिवराय म्हटलं तर लढवया तर आलाच हा शिवरायांचा लढणारा महाराष्ट्र आहे. तो या संकटावर मात केल्या शिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.  

घाबरून युद्ध जिंकलं जात नाही. लोकांनी घाबरून जाऊ नये. सरकारी यंत्रणा जिवाची परवा न करत लढत आहे.  लोकल, बसमधील गर्दी ओसरली आहे. लोकांनी घरातून बाहेर पडू नये. सरकारनं दिलेल्या सुचना पाळून लोकांनी गर्दी कमी करावी. सरकार काही गोष्टी बंद करू शकतं, पण तसं करण्याची सरकारची इच्छा नाही, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

“करोनाचा व्हायरस हळूहळू वाढतोय. काळजीची गरज नाही परंतु नागरिकांनी सुचनांचं पालन केलंय. घाबरून जाऊन चालणार नाही. ज्याला हा आजार झालाय ती व्यक्ती अपराधी नाही. त्यांनी आपला परदेशवारीचा इतिहास लपूव नये. जर त्यांनी असं केलं तर ते चूक आहे. बाहेरून येणाऱ्यांसाठी क्वारंटाईनची सुविधा सुरू करत आहोत. ज्यांच्यात करोनाची लक्षण आढळली त्यांच्यासाठी आयसोलेशनचीही सुविधा सुरू करत आहोत,” असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं

महत्वाच्या घडामोडी-

घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही : मुख्यमंत्री लाईव्ह

‘करोना’ संशयितांची नाव उघड केल्याप्रकरणी मनसेच्या नेत्यावर गुन्हा दाखल

पंकजा मुंडेंनी सुरू केलेल्या ऑनलाइन बदली धोरणाला राष्ट्रवादीचा खो

संसर्ग कमी करण्यासाठी ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय