आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अमरावती : उद्धव ठाकरे यांनी सत्तेपोटी भगवा सोडला आणि हिरवा हातात घेतला, अशी टीका भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अमरावती रेल्वे स्टेशनवर त्यांचे जंगी स्वागत केले. अमरावती जिल्ह्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला.
हे ही वाचा : कोकणात शिवसेनेचा राष्ट्रवादीला मोठा दणका; राष्ट्रवादीच्या सरपंच्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
त्याच दिवशी मला अमरावतीत यायचे होते. पण मला रोखण्यात आले. मी अमरावतीकरांना वचन दिले होते, म्हणून आज मी अमरावतीत आलो आहे. 1992-93 च्या दंगलीत उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर उतरले होते. खरं तर ठाकरे सरकारमुळे मुस्लिमांचा अत्याचार आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेपोटी भगवा सोडला आणि हिरवा हातात घेतला, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्रिपुरात घडलेल्या अत्याचाराच्या प्रकारानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. याचे पडसाद अमरावतीत उमटले असून ‘बंद’देखील पुकारण्यात आला. अमरावतीत झालेल्या हिंसाचाराचादेखील सोमय्या आज आढावा घेणार आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“युझवेंद्र चहल RCB तून बाहेर; विराट कोहलीसह ‘हे’ खेळाडू संघात कायम”
ममता बॅनर्जींच्या भेटीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; शिवसेना-तृणमूल आघाडी होणार?
नाव राष्ट्रवादी, पण काम मात्र कुटुंबवादी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा हल्लाबोल