उद्धव ठाकरे टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांच्या यादीत; प्रविण दरेकरांची टीका, म्हणाले…

0
305

मुंबई : एका वृत्तपत्राने केलेल्या सर्व्हेनुसार देशातील सर्वांत लोकप्रिय असलेल्या 11 मुख्यमंत्र्यांची यादीत जाहीर केली. देशातील टॉप-5 मुख्यमंत्र्यांमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे नाव आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर टीका केली.

एखादी संस्था सर्व्हे करते तेव्हा ती कशाच्या आधारावर करते? त्याबाबत आम्ही खोलात जात नाही. जनतेच्या मनात काय आहे हे महत्त्वाचे आहे. जन आशीर्वाद यात्रेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेची साथ लाभत आहे. हाच आमचा सर्व्हे आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले.

दरम्यान, ठाण्यातील कोव्हिड हॉस्पिटलने 500 कर्मचाऱ्यांना कामावरून अचानक काढून टाकले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनाला भेट देण्यासाठी प्रवीण दरेकर आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेना म्हणजे खंडणी सेना आणि ठाकरे सरकार म्हणजे वसुली सरकार- किरीट सोमय्या

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून लोकांचं जगणं मुश्किल झालं; काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचा घणाघात

“तुम्ही तुमचे इतिहासकार बोलवा, आम्ही आमचे अभ्यासक बोलावू, होऊन जाऊ द्या आमना-सामना”

महाराष्ट्रात मंदीरे बंदच राहणार हा उद्धव ठाकरेंचा ‘नया महाराष्ट्र’; नितेश राणेंची जहरी टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here