Home महाराष्ट्र “उद्धव ठाकरे कधी आयुष्यात हरले नाहीत आणि हरणार देखील नाहीत”

“उद्धव ठाकरे कधी आयुष्यात हरले नाहीत आणि हरणार देखील नाहीत”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सध्या राज्यात जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या पार्श्भूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी पार पडली. या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यावरून आतापशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं काैतुक केलं आहे.

उद्धव ठाकरे हे असं व्यक्तिमत्व आहे की, जे कधी आयुष्यात हरले नाही आणि हरणार देखील नाहीत. कधी थांबले नाहीत आणि कधी थांबणार देखील नाहीत. त्यांच्यासोबत हे पहिल्यांदा घडत नाहीए. अशी अनेक आव्हानं आलेली आहेत. सर्वात मोठं संकट कोरोना आणि त्यांची शस्त्रक्रिया. एवढी मोठी शस्त्रक्रिया होऊन देखील महिनाभराच्या आत त्यांनी राज्याची धूरा हाती घेतली होती आणि सर्वांना काम करण्यास प्रोत्साहन दिले., असं म्हणत केदार यांनी उद्धव ठाकरेंचं काैतुक केलं.

हे ही  वाचा : महाराष्ट्रानं एक सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर संजय राऊतांचं ट्विट

आम्ही लोकांनी जे काम केलं त्याबद्दल आभार मानले गेले. कोणी जर आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य करत असेल, तर त्याचे आभार मानावेच लागतात, असंही केदार म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राजीनामा देताना उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना शेवटचा आदेश, म्हणाले…

‘आता फक्त 48 तास’, भाजपाच्या या नेत्याचं ट्विट; चर्चांना उधाण 

देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना फोन; मनसेचं एकमेव मत भाजपाच्या पारड्यात