मुंबई : जयंत पाटील यांनी कॅबिनेट बैठकीत नाराजी जाहीर केल्यानंतर अखेर जलसंपदा प्रकल्पांच्या कामांच्या यादीला प्रशानाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावर अंतिम निर्णय घेणार आहेत. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
“राष्ट्रवादीच्या हटवादासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झुकावे लागले आहे. जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना अखेर प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. शीतयुद्धात मुख्यमंत्र्यांची हार. शिवसेना 0, राष्ट्रवादी 1,” असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव विजयकुमार गौतम यांना पुन्हा त्याच जागेवर नियुक्ती देण्याचा आग्रह मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी नियमांवर बोट ठेवून फेटाळला होता.
महत्वाच्या घडामोडी –
“देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाज आणि ओबीसी समाजाला भडकवण्याचं राजकारण बंद करावं”
पदोन्नतीचा विषय मार्गी लावला, पोलिस भरतीबाबतही लवकरच निर्णय घेऊ- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
उद्धव ठाकरेंचा कोकण दाैरा म्हणजे लिपस्टीक दाैरा; नितेश राणेंचा घणाघात