मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं.
मात्र ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काही काळ भेट झाल्याचं कळतंय. तसेच ही चर्चा राणेंबाबत झाल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं.
ही बैठक ओबीसी आरक्षणाबाबत होती आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातच चर्चा झाल्याचं फडणवीसांनी यावेळी सांगितलं. यामुळं मुख्यमंत्री आणि फडणवीस यांच्यात नारायण राणे यांच्याबाबत चर्चा झाल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याची शक्यता आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“घरात, पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला, वर्षावर जाऊन गप्पा मारत बसतात”
“उद्यापासून सलग 4 दिवस बँका बंद राहणार”
“राणेंच्या घरासमोर ताकद दाखविण्याऱ्या युवासैनिकाला आदित्य ठाकरेंनी दिलं ‘हे’ मोठं गिफ्ट”
“वरूण सरदेसाई, आमच्या घरावर हल्ला करतोस काय, आता आलास तर परत जाणार नाहीस