Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेजी थोडा अभ्यास करत जा; चंद्रकांत पाटलांचा टोला

उद्धव ठाकरेजी थोडा अभ्यास करत जा; चंद्रकांत पाटलांचा टोला

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातल्या जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. ज्यात त्यांनी, आज मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण लॉकडाऊन लागू करत नाहीये. पण दोन दिवसांत मला दृश्य स्वरूपात फरक दिसला नाही, आणि ज्यांच्याशी मी बोलतोय, त्यांच्याकडून वेगळा पर्याय दिसला नाही, तर जगात ज्या प्रमाणे लॉकडाऊनचे टप्पे जाहीर केले जातात, तसे करावे लागतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोरोना नियंत्रणात संपूर्णपणे अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारने पुण्यात लॉकडाऊन जाहीर केला. परंतु प्रश्न अजूनही तोच आहे… लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेचं काय होणार? याचा विचार या सरकारने केलाच नाही !, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

जगात जिथे जिथे पुन्हा कठोर लॉकडाऊन करण्यात आले, तिथल्या सरकारने त्यांच्या जनतेच्या मदतीसाठी भरघोस पॅकेजदेखील आधी पोहचवले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोडा अभ्यास करत जा !, असं ट्विट करत चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पंढरपूर-मंगळवेढा निवडणुकीत भाजपला धक्का देण्याची तयारी, भाजपचा ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

“मोठी बातमी! शरद पवार यांना रूग्णालयातून डिस्चार्ज”

होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

तुम्ही काय फक्त कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करायला मुख्यमंत्री झालात का?; गोपीचंद पडळकरांचा सवाल