ठाकरे कुटुंबातला भावनिक क्षण; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फोन; तब्येतीची केली विचारपूस

0
2181

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई आणि बहिणीलाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राज ठाकरे उपचारासाठी आता लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. राज यांचे बंधू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याची माहिती पडताच त्यांनी थेट राज ठाकरे यांना फोन केला आणि तब्येतीची विचारपूस केली.

हे ही वाचा :‘सरकार तुमचं आहे, हिंमत असेल तर औरंगाबादचं नाव बदलून दाखवा’; इम्तियाज जलील यांचा इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी राज ठाकरे यांना फोन केला. उद्धव ठाकरेंनी राज यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याचबरोबर राज यांच्या आई आणि बहिण जयंवती ठाकरे देशपांडे यांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली.

दरम्यान, ठाकरे कुटुंबातला हा भावनिक क्षण होता. राजकीय मतभेद बाजूला सारत दोन्ही भाऊ आज एकत्र आल्याचे पुन्हा बघायला मिळाले.

महत्वाच्या घडामोडी – 

…म्हणून मी नितीन गडकरींना भेटले; पंकजा मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण

संजय राऊतांना हिंदुत्व कळलेले नाही, यासाठी…; नारायण राणेंची टीका

वानखेडेंची नोकरी जातेय की मलिक यांचं मंत्रिपद जातंय ते पाहुया; रामदास आठवलेंचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here