आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सुपर मार्केट तसंच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रिसाठी परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. अशातच साताऱ्यात ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारवर टीका केली.
“विधानसभेत हा प्रश्न मांडला असता आणि मंजूर झाला असता तर अशा प्रकारचं आंदोलन करता आलं नसतं. पण मंत्रिमंडळातील मूठभर आमदारांनी एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्रावर दारुविक्रीचा हा अत्याचार लादला आहे. याविरोधात एकच संस्था तळमळीने काम करत आहे ती म्हणजे व्यसनमुक्त युवक संघ आहे, असं बंडातात्या कराडकर म्हणाले आहेत.
आम्ही फक्त समाजाच्या कल्याणासाठी गेली 25 वर्ष आम्ही हे काम करत आहोत. आज शासनाला इशारा देण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं,” अशी माहिती यावेळी बंडातात्या कराडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
हे ही वाचा : “ राणे महासंत आहेत, त्यांची…”; नितेश राणेंना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर गुलाबराव पाटलांचा टोला
“ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे”. यावेळी ढवळा कोण? पोवळा कोण? असं विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार, असंही बंडातात्या कराडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, लोकांवर भयंकर असा निर्णय लादण्यात आला आहे त्यावर आम्ही नाराज आहोत. अत्यंत शांततेत आम्ही आंदोलन करत होतो. हातात काठ्या असल्याने पोलिसांचा गैरसमज झाल्याने त्यांना रोखलं होतं. काठ्या बाजूला ठेवून आंदोलन करण्यास आंदोलनाची परवानगी दिल्याने आम्ही पोलिसांचे आभारी आहोत. आम्हाला आधी पुढे जाऊन देणार नसल्याचं कळलं होतं. हे आंदोलन येथे थांबणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र रुप घेईल. त्यानंतर राज्य सरकारवर वाइन विक्रीची जी धुंदी चढली आहे ती कमी होईल आणि हा निर्णय मागे घ्यावाच लागेल”, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
सर्वात जास्त पिणारी मंडळी भाजपमध्येच आहेत; नवाब मलिकांचं जोरदार प्रत्युत्तर
बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ‘त्या’ आमदारांना रस्त्यात तुडवा, संजय राऊतांनी सांगितली जुनी आठवण
“दु:खद बातमी! कोरोनामुळं शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं निधन”