आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर आता महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हालचालींना वेग आला असून निकालानंतर दुसऱ्याच दिवशी, शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली.
सिल्व्हर ओकमध्ये झालेल्या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आल्या. या बैठकीला शरद पवारांसह उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडीचे मुख्य नेते उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा झाली, मात्र यावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
ही बातमी पण वाचा : “प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी, गाैतमी पाटील हिनं घेतली, छत्रपती उदयनराजे भोसलेंची भेट, चर्चांना उधाण”
शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या महाविकासआघाडीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या 48 जागांच्या वाटपाबाबत चर्चा झाली, अशी माहिती महाविकासआघाडीच्या नेत्यांनी दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही नेते लोकसभा निवडणुकीत तीनही पक्ष समसमान म्हणजेच प्रत्येकी 16 जागांवर लढतील, अशी चर्चा झाल्याची माहिती देत आहे. मात्र 2019 निवडून आलेल्या 18 जागा आणि 2 अतिरिक्त जागांवर शिवसेनेचे सर्वोच्च नेते, ठाम असल्याची माहिती समोर येत आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“काँग्रेसच्या विजयानंतर आम्हाला ऊर्जा मिळाली”