मुंबई : महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून गुरूवारी उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली त्यांनतर शुक्रवारी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी शिवसेनेचे नेते आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पदभार स्वीकारण्याआधी उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकावर जाऊन अभिवादन केलं. यावेळी राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांनी जल्लोष केला.
उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात आल्यानंतर तळमजल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला अभिवादन केलं.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 2 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.