उदयनराजेंच म्हणणं बरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांवर राजकारण करणं योग्य नाही- जयंत पाटील

0
178

मुंबई : शपथविधीदरम्यान ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज देण्यावरुन सध्या वाद सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर  जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला असता तर मी त्या ठिकाणी राजीनामा दिला असता पण तसं काही झालं नाही. त्यामुळे महाराजांवरून कोणीही राजकारण करू नये, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. यावर जयंत पाटील यांनी दुजोरा दिला आहे

उदयनराजे भोसले यांचं म्हणणं बरोबर आहे. शिवाजी महाराजांच्या घोषणांवर कुणीही विनाकारण राजकारण करणं योग्य नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही”

…तो प्रश्न विचारल्यावर संजय राऊत झाले आक्रमक; म्हणाले…

“चीनसोबतचा तणाव वाढत असतानाच शरद पवारांना केंद्रात मोठी जबाबदारी”

“नितीन राऊत यांनी सर्वांशी चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा होता”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here