मराठा आरक्षणाच्या लढाईचे नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावी; ‘या’ नेत्याने केली मागणी

0
177

बीड : मराठा आरक्षणाच्या लढाईचे नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावं, अशी मागणी शिवसंग्राम पार्टीचे नेते व भाजप आमदार विनायक मेटे यांनी केली आहे.

मराठा आरक्षण पूर्ववत द्यावे या मागणीसाठी राज्यभर अनेक संघटना अनेक राजकीय पक्ष आणि व्यक्ती हा लढा देत आहेत. मात्र या मागणीमध्ये एकवाक्यता बघायला मिळत नाही. म्हणून मराठा आरक्षणाच्या या लढाईचे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी करावं असं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.

या संदर्भामध्ये हे उदयनराजे भोसले यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवणार असून लवकरच या संदर्भात मराठा आरक्षणाच्या लढ्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुण्यामध्ये बैठक घ्यावी आणि त्याचे नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावं, अशी विनंती विनायक मेटे यांनी केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकार गेल्या 5-6 दिवसांपासून केवळ आश्वासन देत असून कोणताही निर्णय घेत नाही. राज्यभरातील मराठा संघटना, समन्वयकांना एका व्यासपीठावर घेऊन आरक्षण आंदोलनात छत्रपती उदयनराजेंनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन विनायक मेटे यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

जनतेच्या पैशातून ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी?; उर्मिला मातोंडकरांचा केंद्राला सवाल

अमरावतीच्या बाहेर निघून दाखवा; शिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमकीचा फोन

‘ही’ शेतकऱ्यांशी बेईमानी नाही तर काय?; बच्चू कडू यांचा केंद्र सरकारला सवाल

मला बोलवा, मी कुठेही क्रिकेट खेळायला तयार आहे- एस श्रीसंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here