Home महाराष्ट्र उदयनराजे भोसलेंनी सांगितलं शरद पवारांना भेटण्यामागचं कारण; म्हणाले…

उदयनराजे भोसलेंनी सांगितलं शरद पवारांना भेटण्यामागचं कारण; म्हणाले…

मुंबई : भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावर बोलताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण शरद पवार यांना भेटलो असल्याचे त्यांनी सांगत उदयनराजेंनी खुलासा केला आहे.

शरद पवार यांची भेट घेण्यामागचं कारण म्हणजे, “ मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा होता. आमची एकच मागणी आहे, जेवढं गांभिर्याने महाराष्ट्र शासनाकडून बाजू मांडायला हवी होती, ती काही मांडली गेली नाही. त्यामुळे लोकांच्या मनात मोठी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे, असं उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, आज मराठा समजातील लोकांची एवढीच अपेक्षा आहे की, “अन्य समाजातील लोकांना ज्याप्रमाणे आरक्षण दिलं गेलं. त्याचप्रमाणे कुणाचाही आरक्षणाला धक्का न लावता, आम्हाला देखील आरक्षण मिळालं पाहिजे. शरद पवार हे मराठा समाजातील ज्येष्ठ व राजकारणात सक्रीय आहेत व आज राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसची जी सत्ता आहे, त्याचे सर्वेसर्वा शरद पवार हे आहेत. त्यामुळे एक वडिलकीच्या नात्याने त्यांनी यामध्ये लक्ष घालावं. अन्यथा फार मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल. असंही उदयनराजेंनीं म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी 

आता महाराष्ट्रातील जनता या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल- आशिष शेलार

BREAKING NEWS! उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

राज्यपालांना विमानातून खाली उतरवलं, आता जनता तुम्हांला सत्तेतून उतरवेल- सुधीर मुनगंटीवार