आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली नगरपंचायतीत सत्तेचं समीकरण बदलणार आहे. नगरपंचायत निवडणुकीत अपक्ष विजयी झालेले दोन उमेदवार शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशामुळे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना बळ मिळणार आहे.
नागेंद्र राजगोपाल सुलावार व सुनील कुडमेथे या अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. एटापल्ली नगरपंचायतीत काँग्रेसचे पाच, राष्ट्रवादीचे तीन, तर शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडूण आलेत. यात दोन अपक्षांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं महाविकास आघाडीकडं दह दहा नगरसेवक होतात. हे सर्व एकत्र अल्यास महाविकास आघाडीची सत्ता बसू शकते.
हे ही वाचा : काँग्रेसचा शिवसेनेला दणका, भिवंडीतील ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश
एटापल्ली नगरपंचायतीत भाजप तीन, काँग्रेस-राष्ट्रवादी तीन, काँग्रेस पाच आदिवासी विद्यार्थी संघटना दोन अपक्ष चार उमेदवार विजयी झाले होते. यात विजयी झालेल्या उमेदवारातून दोन अपक्ष उमेदवाराने काल रात्री शिवसेनेचे पक्षात प्रवेश केला. गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक असलेले शिवसेना पक्षाचे किरण पांडव यांच्या नेतृत्वात या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
महत्वाच्या घडामोडी –
गोव्यासाठी काँग्रेसनं अन् भाजपनं नेमका किती खर्च केला? अमित शाहांनी वाचला पाढा, म्हणाले…
‘आजच्या दिवशी महात्मा गांधीजींचा वध नथुराम गोडसेने केला’; नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य
मनसेत जोरदार इनकमिंग; परभणीमधील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी हाती धरला मनसेचा भगवा