उस्मानाबाद : विधानपरिषदेच्या नागपूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजय मिळवला. तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना पराभव पत्करावा लागला. यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील मुद्लेश्वर मंदिरात मीनाताई ठाकरे यांच्या स्मरणार्थ विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
भाजपला मतदारांनी 100 टक्के धुडकावून लावले आहे. विदर्भ, नागपूरमध्ये भाजपचा पराभव झाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बडबड बंद करावी. महाविकास आघाडी सरकारवर आमचा विश्वास आहे. हा सल्ला विदर्भातील जनतेने दिला आहे, असं म्हणत विनायक राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
दरम्यान, भाजपने विरोधी पक्षात काम करायचे आहे, हा संदेश महाराष्ट्रातील जनतेनं दिला. या संदेशाचे भाजपने तंतोतंत पालन करावे, असा सल्लाही यावेळी राऊतांनी दिला.
महत्वाच्या घडामोडी-
टी.नटराजन-युझवेंद्र चहलची घातक गोलंदाजी; भारताचा ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय
“महाविकास आघाडीला मनात जागा देऊन जनतेनं भाजपला त्यांची जागा दाखवून दिली”
के.एल.राहूल-रविंद्र जडेजाची वादळी खेळी; भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 162 धावांचे लक्ष्य
हिंमत असेल तर एकएकटे लढा; चंद्रकांत पाटलांच महाविकास आघाडीला आव्हान