राजकारणात पवार साहेबांंना हरवण्याचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार- जयंत पाटील

0
172

मुंबई : महाराष्ट्राला धक्का देणारी घटना काल एका रात्रीत घडली. सकाळी अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधल आहे.

शरद पवारसाहेब यांना राजकारणात हरवण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार आहे. पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणात कालही सूर्य होते, आजही आहेत व उद्याही कायम असतील, असं ट्वीट जयंत पाटील यांनी केलं आहे.

साहेब हरतील किंवा जिंकतील पण शरद पवार एक मराठा लढवय्याप्रमाणे या युध्दात लढत आहेत. मग मोदी-शाहांचे राजकारण असो किंवा कुटुंबातील गद्दारी, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअ‌ॅप स्टेटस ठेवत अजित पवार आणि मोदी- शहांवर निशाणा साधला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here