Home पुणे तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; शिर्डीत फटाके फोडून जल्लोष

तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; शिर्डीत फटाके फोडून जल्लोष

शिर्डी : साई संस्थानकडून भाविकांना भारतीय पोशाखातच दर्शाला येण्याची विनंती करणाऱ्या बोर्डवरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. फलक हटवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई या सकाळीच शिर्डीकडे जाण्यासाठी रवाना झाल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना नगरच्या सीमेवर सुपे टोलनाक्याजवळ रोखलं आणि ताब्यात घेतलं.

साई संस्थानने महिलांच्या ड्रेसकोडबाबत लावलेला तो बोर्ड हटवण्यासाठी आम्ही शिर्डीला चाललो आहोत. याद्वारे आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. आमचा हक्क मिळवण्यासाठी आम्ही शिर्डीकडे निघालो आहोत. मात्र, पोलिसांनी आम्हाला नगरच्या आधीच अडवलं असून याद्वारे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण पोलिसांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही शिर्डीला जाणारच आहोत, असं तृप्ती देसाई  यांनी यावेळी म्हटंल आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शक्ती कायदा सर्वांसाठीच एकसमान, मग ते…; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

दानवेंनी पुरावे द्यावेत, केंद्राने सर्जिकल स्ट्राईक करावा- संजय राऊत

“रावसाहेब दानवे हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी त्यांचा डीएनए तपासणं गरजेचं आहे”

“मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं निधन”