आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील नागरिकांना स्वातंत्र दिनाचं औचित्य साधत हर घर तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी तिरंगा लावण्याचं आवाहन केलं आहे. याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही पाठिंबा दर्शविला आहे.
केंद्र सरकारच्या या मोहिमेला राज ठाकरे यांनी पाठिंबा देत शिवतिर्थवर तिरंगा फडकवला आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या घराच्या गॅलरीत लावलेला तिरंगा आणि त्यांच्या नातवाचा एक अनोखा फोटो आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपला आहे.
हे ही वाचा : “सांगलीत मोठा राजकीय भूकंप?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-विश्वजीत कदम यांच्यात बंददाराआड चर्चा”
दरम्यान, या फोटोत किआन हा बाल्कनीत पाळण्यात झोपलेला आहे. या बाल्कनीत राष्ट्रध्वज लावण्यात आला आहे. हा ध्वज वाऱ्यामुळे फडकतोय. त्याच्या आवाजातून किआनचं ध्वाजाकडे लक्ष गेल्याची शक्यता आहे. हे दृश्य राज ठाकरेंनी आपल्या मोबाईलमध्ये टिपलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पाणी पातळीत ‘इतक्या’ फुटांनी वाढ, एनडीआरएफची टीम सांगलीत होणार दाखल
मनसेत पक्षप्रवेशाचं वारं; रक्षाबंधनाला असंख्य महिलांनी धरला मनसेचा झेंडा