मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी राज्यात 15 जूनपर्यंत निर्बंध कायम राहातील असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
जनतेवर निर्बंध लादावे लागतात या सारखं दुसरं कटू काम नाही, पण ते मला नाईलाजाने करावं लागत आहे. आपल्या राज्याच्या व सर्वांच्या जीवाच्या काळजी पोटी करावं लागत आहे.” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
जिल्ह्यांमधील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन काही जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करावे लागतील, तर काही जिल्ह्यांमध्ये कदाचित निर्बंध शिथील केले जातील असं देखील उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
दरम्यान,आता आपण निर्बंध लावत आहोत, पण कडक लॉकडाउन केलेला नाही. असंही ते म्हणाले. याशिवाय, तौते वादळग्रस्तांना मदत देण्यास सुरूवात होत आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
देशातील जनतेला कोरोनाच्या खाईत लोटणा-या मोदींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा- नाना पटोले
काँग्रेसच्या काळात महागाईवर आंदोलन करणारे आता कुठं लपलेत?- बाळासाहेब थोरात
…तर बाळासाहेब वरुन थोबाडीत मारतील; चंद्रकांत पाटलांचा टोला
चंद्रकांतदादांना काय बोलावं हे कळत नाही, त्यांना मस्ती आली आहे; हसन मुश्रीफांचा हल्लाबोल