नागपूर : GST च्या विरोधात येत्या 26 फेब्रुवारी रोजी रोजी व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. त्या दिवशी उद्योग-व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचं व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) ही बंदची हाक दिली असून या कायद्या विरोधात 26 फेब्रुवारी रोजी देशभरात चक्काजाम करण्याची घोषणाही केली आहे. नागपूरमध्ये आजपासून सीएआयटीचं (कॅट) 3 दिवसाचं राष्ट्रीय व्यापार संमेलन सुरू झालं आहे. कॅटच्या अंतर्गत येणारे देशातील 8 कोटी व्यापारी या आंदोलनाला पाठिंबा देतील.
दरम्यान, या आंदोलनाला ट्रान्स्पोर्ट सेक्टरची सर्वात मोठी संघटना असलेल्या ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट वेल्फेअर असोसिएननेही या आंदोलनाला पाठिंबा दिला असून या आंदोलनात प्रत्यक्ष उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या घडामोडी
भाजप शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचा काम करत आहे- जयंत पाटील
राज्याच्या महाविकास आघाडीतील तीनही पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने- अजित पवार
राज्यात ऑपरेशन लोट्स झाल्यास भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही- नाना पटोले
घमंड जादा हो तो हस्तियाँ डूब जाती है; संजय राऊतांचं अमित शहांना त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर