आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
खोपोली : मराठा आरक्षणाच आंदोलनाचा आवाज अशी ओळख असलेले शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज पहाटे अपघाती निधन झालं.
मराठा समाजाच्या बैठकीसाठी पुण्याहून मुंबईला येत असताना खोपोली बोगद्याजवळ मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. अपघात इतका जबर होता की, मेटे यांच्या गाडीचा चक्काचूर झाला. तसेच डोक्याला जबर मार लागल्याने मेटे यांचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा : आर आर पाटलांचा मुलगा रोहित पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
अपघात झाल्यानंतर विनायक मेटे यांना तासभर उपचारच मिळाले नाहीत. ते तासभर गाडीतच पडून होते, असा धक्कादायक आरोप विनायक मेटे यांचे चालक एकनाथ कदम यांनी केला आहे. तसेच अपघातानंतर पोलीसही वेळेवर घटनास्थळी पोहोचले नसल्याचे समोर आलं आहे.
दरम्यान, आम्हाला मदत मिळावी म्हणून. आम्ही गाड्या थांबवण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर झोपलो. परंतु कुणीच गाड्या थांबवल्या नाही. आम्ही 100 नंबरला फोन केला. पण फोनही उचलला गेला नाही. आम्ही वाहनांना हात करत होतो. पण कुणीच मदत केली नाही. बऱ्याच वेळानंतर एका टेम्पो चालकाने गाडी थांबवून आम्हाला मदत केली
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेना नेते आदित्य ठाकरेंविषयी बोलताना खासदार धैर्यशील माने यांना अश्रू अनावर, म्हणाले…
…तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्रीपदाची संधी; नितीन गडकरींच्या वक्तव्याने खळबळ
“शिवतीर्थवर फडकला तिरंगा, राज ठाकरेंच्या नातवाचा क्यूट फोटो व्हायरल”