आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावरून मनसेने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
छत्रपती संभाजीनगर या नावासाठी साठी सदैव आग्रही असणारे राजसाहेब ठाकरे व नामांतर घडवून आणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांनी आज आभार मानायला हवे, असं मनसेचे नेते अमेय खोपकर म्हणाले आहेत.
हे ही वाचा : आगामी काळात महाविकास आघाडी एकत्रित राहील का? जयंत पाटील म्हणतात…
आज जर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असते तर महाविकास आघाडीची आजची सभा ‘औरंगाबाद’ मध्येच झाली असती, असा टोलाही अमेय खोपकर यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, अमेय खोपकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विट वरून निशाणा साधला आहे.
छ. संभाजीनगर या नावासाठी साठी सदैव आग्रही असणारे मा. राजसाहेब ठाकरे व नामांतर घडवून आणणारे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांनी आज आभार मानायला हवे.
कारण आज जर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असते तर म.वि.आ. ची आजची सभा 'औरंगाबाद' मध्येच झाली असती. pic.twitter.com/oahAwVdzNb— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 2, 2023
महत्त्वाच्या घडामोडी
संजय राऊतांवर टीका करताना, शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराची जीभ घसरली, म्हणाले…
खुर्चीसाठी आपण बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि तत्व विसरलात; शिंदे गटाचा हल्लाबोल
महाविकास आघाडीच्या सभेआधीच ठाकरे गट-शिंदे गटाचे ‘हे’ नेते एकत्र, चर्चांना उधाण”