मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. यावर विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोरोनाचा परिणाम न होऊ देता अर्थसंकल्प सादर केला गेला. आरोग्य, आर्थिक आणि पायाभूत सुधारणांस विकास, नाविन्यता आणि विकास अशा 6 सूत्रांवर अर्थसंकल्प सादर केला गेला, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सर्व क्षेत्रातील सर्व कामगारांना किमान वेतन कायदा लागू करण्यात आला. देशाच्या इतिहासात कामगारांसाठी घेण्यात आलेला हा क्रांतिकारक निर्णय आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच संकटाचं संधीमध्ये रुपांतर कसं करतात हे दाखवणारा आजचा अर्थसंकल्प आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी या अर्थसंकल्पनेचं स्वागत केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“केंद्रीय अर्थसंकल्पानं देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलंय”
…तर बंगळुरवर देखील आमचा अधिकार; जयंत पाटलांचं कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
शरद पवारांवर टीका केल्याशिवाय आमचा पक्ष वाढूच शकत नाही- चंद्रकांत पाटील