आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी विकासाची पंचसूत्री मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी ज्यांच्याकडे अर्थ खातं देखील आहे, त्यांनी आज राज्याच्या आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प मांडला आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे, की मागील दोन वर्ष विविध आपत्तींना तोंड देत देत राज्याचा विकास सातत्याने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आजचा हा अर्थसंकल्प हा त्या दृष्टीने विकासाच्या दिशेने टाकलेलं एक पुढचं पाऊल आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “शरद पवार यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीसांचं आहे”
जे काही करता येणं शक्य आहे ते आम्ही करत आलेलो आहोत आणि यापुढे देखील करणार आहोत. हे आजच्या अर्थसंकल्पातून सूचित होत आहे आणि ठाम पणाने सांगू इच्छितो की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प हा आपल्या सर्वांच्या साक्षीने जनतेसाठी आणि राज्यातील माता-भगिनींचा विकास करणारा आणि त्यांना आधार देणारा आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणं म्हणजे…; जयंत पाटलांची भाजपावर टीका
मुंबई महानगर पालिकेच्या विरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; पालकमंत्र्यांना दिला इशारा
“जोतिबा मंदिराचा ई-पास बंद करण्यासाठी, ग्रामस्थांकडून गाव बंद ठेवून, मंदिरासमोर आंदोलन”