मुंबई : मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालायाच्या या निर्णयावरुन राज्याच्या इतिहासातील आजचा दिवस हा काळा दिवस आहे, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
आमच्या सरकारनं आरक्षण दिलं. आरक्षण काही दिवस टिकलं परंतु आता स्थगिती मिळाली. आम्ही शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं. पण महाभकास आघाडीला ते न्यायालयात टिकवता आलं नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाकडे आम्ही गांभीर्यानं लक्ष द्यायला सांगितलं होतं. परंतु अशोक चव्हाणांना ते जमलं नाही. सरकारनं आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. तामिळनाडूचं प्रकरणही खंडपीठाकडे आहे स्थगिती मिळाली नाही मग आपल्या सरकारला ते का नाही जमलं? असा सवालही चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी-
राज्याच्या इतिहासातील आजचा दिवस हा काळा दिवस; चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
बात हरामखोरीची निघाली तर…; आशिष शेलारांचा सामनावर निशाणा
“रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला”