मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेला आता भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे.
ज्याप्रमाणे संताजी-धनाजी सारखे पाण्यात दिसायचे, त्याप्रमाणे सरकारी पक्षांना देवेंद्र फडणवीसांशिवाय कोणीच दिसत नाही, असा टोलाही दरेकर यांनी हाणला आहे. केंद्र सरकारने कोविडच्या परिस्थितीमध्ये काय मदत केली, याचा सविस्तर लेखा-जोखा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले.
कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा केल्यानंतर सरकारचे अपयश आणि निष्क्रियता चव्हाट्यावर आणली. त्यामुळे सरकारची असुया आता दिसत असल्याचं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापेक्षा सरकारने कोरोनाचे नियोजन आणि त्याचं निर्मुलन करण्याकडे अधिक लक्ष आणि वेळ द्यावा, असा सल्लाही प्रविण दरेकर यांनी दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
रश्मी ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण
भगतसिंग कोश्यारी यांचं व्यंकय्या नायडूंना पत्र; म्हणाले…
कोरोना हा महाराष्ट्र शासनासाठी पैसा मिळवण्याचा व्यवसाय; नितेश राणेंचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
“आमचा देखील रामावर तेवढाच विश्वास आहे, पण कोरोना संकटात डॉक्टर हाच देव”