मुंबई : विधानसभा निवडणुकीपासून राज्यातील भाजपाच्या नेतृत्वावर नाराज असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
आजपर्यंत मी पक्षाच्या विरोधात, नेत्याच्या विरोधात कधीही बोललो नाही. मला देवेंद्रजींकडून त्रास झाला म्हणून बोललो. पक्षाच्या विरोधात कधीही बोलणार नाही. आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का? नाथाभाऊ अन्याय सहन करणार नाही. स्वस्थ बसणारा नेता नाही. मला न्याय मिळत नाही तो पर्यंत मी पक्षाला प्रश्न विचारणार आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
दरम्यान, सगळे म्हणतात नाथाभाऊ चांगले, मग तिकीट का दिले नाही? मुख्यमंत्री होऊ शकलो नाही याचं दुःख नाही. उत्तर महाराष्ट्राला कधीही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, अशी खंतही खडसेंनी व्यक्त केली.
महत्वाच्या घडामोडी-
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचाही एकेरी उल्लेख चालवून घेतला नसता”
“रामदास आठवले कंगना रणाैतच्या घरी; RPI चा कंगनाला पाठिंबा”
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; मराठा समाजाने संयम बाळगावा- अशोक चव्हाण
“मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण”