मध्यप्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करायला भाजपला अनेक जन्म घ्यावे लागतील- धनंजय मुंडे

0
368

मुंबई : महाराष्ट्रातही काही दिवसांत मध्यप्रदेशची पुनरावृत्ती होईल, असं वक्तव्य भाजप नेत्यांकडून केलं जात आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

मध्यप्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करायला भाजपच्या राज्यातील आणि दिल्लीतील नेत्यांना अनेक जन्म घ्यावे लागतील, हे कदाचित त्यांना ठाऊक नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले.

सरकार पाडण्यासाठी मुहूर्त शोधणे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे काम आहे. अशी कितीतरी मुहूर्त शोधली आहेत. मध्यप्रदेशमध्ये झालेल्या राजकीय बदलाचा आनंद महाराष्ट्रातील भाजपने एप्रिलपर्यंतच काय दिवाळीपर्यंत घेतला तरी चालेल. पण महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांना मध्यप्रदेशसारखा आनंद घेता येणार नाही, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शिमगा नुकताच संपल्यामुळे विरोधकांना कुठला मुहूर्त शिल्लक राहिलेला नाही”

महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टिकेल यात शंका नाही- शरद पवार

” गो कोरोना नाही, तर मग काय कम कोरोना असं म्हणू का?”

तुम्ही जेव्हा हाफ चड्डी घालायला शिकला तेव्हापासून शरद पवार फूल पॅण्ट वापरतात; राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here