आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना धारेवर धरलं आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही त्यांनी मनी लाॅंडरिंगचे आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमय्यांनी काल कोल्हापूरात बोलताना शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. यावरून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली.
मला त्यांच्याविषयी जास्त बोलण्याचं काही कारण नाही. पण, मी त्यांना इशारा देतोय की, केंद्राकडून संरक्षण देऊन शिवसेनेवर बोलण्यापेक्षा तुझ्यात जर दम असेल तर मुंबईत कुठेही सांग आणि माझ्यासोबत लढायला ये. तुला दाखवून देतो, शिवसेना काय आहे, असा इशारा राजेश क्षीरसागर यांनी सोमय्यांना यावेळी दिला.
दरम्यान, केंद्राचं संरक्षण घेऊन फालतू बडबड करणं फार सोपं असतं म्हणून तू तुझ्या लायकीत रहा. पक्षाविषयी मातोश्रीविषयी काही बोलू नको. सत्ता आज असते, उद्या असते. उद्या जर केंद्रातली सत्ता गेली तर तुला फाॅरेनमध्ये पळून जावं लागलं, एवढं लक्षात ठेव, असा सज्जड दमही राजेश क्षीरसागर यांनी यावेळी भरला.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपचा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न; भरवले जाणार खड्ड्यांचे चित्रप्रदर्शन
संजय राऊत शिवसेनेला बुडवणार; नितेश राणेंची टीका
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंचा पुन्हा पुणे दौरा
…तर तुमची दिवाळी सुखात जाऊ देणार नाही; नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा