Home महाराष्ट्र “मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन; मातोश्री उडवून देण्याची दिली धमकी”

“मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन; मातोश्री उडवून देण्याची दिली धमकी”

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमच्या हस्तकानं मुख्यमंत्र्यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. यामुऴे मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दुबईवरुन मातोश्रीवर धमकीचे तीन ते चार फोन आले. त्या फोनवरुन मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, रात्री 2 वाजता दुबईवरुन मातोश्रीवर एक फोन आला. या फोनवरील व्यक्तीने दाऊदला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचं सांगत कॉल ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र कॉल ऑपरेटरने फोन ट्रान्सफर केला नाही. सध्या याबाबतची चौकशी सुरु आहे, अशी माहिती मुंबईच्या क्राईम ब्रांचने दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

घाबरु नका, कोरोना संपल्यावर आपलीच सत्ता येईल; रावसाहेब दानवे पाटलांचं वक्तव्य

कोरोनाविरोधात एकत्र येऊया; चंद्रकांत पाटलांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

पुण्यातील लॉकडाऊन व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हटवला- अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेस अध्यक्ष करा- रामदास आठवले