मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादाचा फटका शिवसेनेला बसत असला तरी सत्तेपायी तो त्यांना चालेलच, अंस म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
सत्तेची हाव इतकी होती की या खुर्चीला किती काटे आहेत ते आत्ता त्यांना जाणवायला लागलं आहे. पंढरपूरला गेलो तरी आक्षेप, नाही गेलो तरी आक्षेप. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादाचा फटका शिवसेनेला बसत असला, तरी सत्तेपायी तो त्यांना चालेलच. सत्तेची हाव मोठी आहे, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री किंवा सत्ताधाऱ्यांचा लोकांशी काहीच संबंध नाही. आम्ही सत्तेत असताना विरोधकांना तेव्हाही विचारात घेत होतो. एकट्या देवेंद्र फडणवीसांना जरी दिवसाचे दोन तास मागितले असते तर त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला इगो आडवा येतोय, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
चौथीची पोरगी पण सांगेल की ठाकरे सरकारचं काही खरं नाही; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा
“जातो माघारी पंढरीनाथा; तुझे दर्शन झाले आता”