मुंबई : देशभरातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या दोन तासानंतर चमत्कार झालेला पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पूर्णपणे पिछाडीवर पडलेल्या भाजपप्रणित ‘एनडीए’ने जोरदार पुनरागमन केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले. अखिलेश यादव यांच्यासोबत उत्तर प्रदेशात आघाडी केली. तेव्हा सपा पराभूत, डाव्यांसोबत पश्चिम बंगालमध्ये गेले, डावे सपाटून ममता बॅनर्जींसमोर हारले. आणि आता तेजस्वी सोबत काँग्रेस गेली आणि तिथेही आता पराभव, असं म्हणत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला टोला लगावला आहे.
@RahulGandhi यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले. @yadavakhilesh सोबत उत्तर प्रदेशात आघाडी केली तेव्हा सपा पराभूत. डाव्यासोबत पश्चिम बंगाल मध्ये गेले डावे सपाटून @MamataOfficial समोर हारले. आणि आता @yadavtejashwi सोबत @INCIndia गेले आणि तिथेही आता पराभव
— Keshav Upadhye (@keshavupadhye) November 10, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“बिहारच्या जनतेने लालूप्रसाद यादव व काँग्रेसचे गुंडाराज नाकारलंय”
बिहार निवडणुकांतील यश आणि विजय देवेंद्र फडणवीसांमुळे; निकालापूर्वीच भाजपच्या नेत्याकडून श्रेय
भाजपच्या ‘त्या’ प्रयोगामुळे नितीशकुमारांना फटका, मोदींचा करिश्मा राहिला नाही- छगन भुजबळ
बिहारमध्ये एनडीए’चं जोरदार पुनरागमन, महागठबंधन पिछाडीवर