Home महाराष्ट्र “ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये”

“ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये”

मुंबई : जम्मू काश्मिरमधील गुपकर डिक्लेरेशनमध्ये काँग्रेसही सहभागी असल्याचा आरोप विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी नाही. काँग्रेस पक्षाचा गुपकर डिक्लेरेशनशी कोणताही संबंध नाही. काँग्रेसवर आरोप करण्याचा नादात आपण खोटे बोलत आहोत याचे भानही त्यांना राहिले नाही. बोलण्याच्या अगोदर त्यांनी जरा माहिती घेतली असती तर बरे झाले असते., असं म्हणत थोरातांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यांच्या लढ्यात ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये. महेबूबा मुफ्ती यांनी तिरंग्याच्या विरोधात विधान केले, याचा 52 वर्ष आपल्या मुख्यालयात तिरंगा न फडकवणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक फडणवीस आता विलाप करत आहेत., असं फेसबुक पोस्ट करत थोरातांनी फडणवीसांना धारेवर धरलं आहे.

https://www.facebook.com/bbthorat/posts/1787661548055777

महत्वाच्या घडामोडी-

“भाजपचा भेसळयुक्त भगवा मुंबईवर कधीच फडकणार नाही”

“बाॅलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घरी कोरोनाची एन्ट्री”

शिवसेनेनं गेल्या अनेक वर्षात मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप केलंय- प्रवीण दरेकर

“लोकांना कर्मयोग आवडतो बोलघेवडेपणा नाही”