काम करणारे पुढे या, मिरवणाऱ्यांनो बाजूला व्हा; फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्यांना अजित पवारांनी खडसावलं

0
339

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. आजही बारामतीत अजित पवारांनी फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना खडसावलं.

बारामतीत आज विद्या प्रतिष्ठान संकुलाच्या परिसरात विविध संस्थांच्या वतीने आयोजित समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी अजित पवार यांनी फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्यांना चांगलंच खडसावलं. काम करणारे पुढे या, मिरवणाऱ्यांनी बाजूला व्हा, असं म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना टोला लगावला.

बारामतीतील अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत पाठवण्यात आली. यावेळी अजित पवार यांनी मिरवणारे बाजूला व्हा, ज्यांनी काम केलंय, त्यांना पुढे येऊ द्या, असं म्हणत अजित पवारांनी कार्यकर्यांना खडसावलं. तर बाजूलाच स्व. तुकाराम भापकर प्रतिष्ठानकडून 5 टँकर देण्यात आले. त्यावेळीही अजित पवारांनी ज्यांनी काम केलंय त्यांनी फोटोसाठी उभे रहा आणि बाकीचे बाजूला व्हा, असं म्हणत समाजोपयोगी काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

“11 वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करता शेवटचा अर्ज”

संविधान व देशाला वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षच सक्षम पर्याय – नाना पटोले

प्रवीण दरेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; चर्चांना उधान

हे आमच्या घटनेचे दुर्दैव; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here